Ads Area

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे.

लाडकी बहिण E-Kyc वेबसाईटपूर्णता सुरळीत चालत आहे.

  
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण eKYC, 😃 आता OTP प्रॉब्लेम येत नाही, लवकरात लवकर आपली eKYC करून घ्या... वेबसाईट आता व्यवस्थित सुरू झाली आहे
[Last Date : 30 Octomber 2025]
  The Official Website is Keep Visiting 🔗 www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2025.

प्रवेशपत्र निकाल
-♦- Advertisement

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

🔰पात्रता : 

  • १. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • २. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • ३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • ४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • ५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
  • 📢अपात्रता : 
  • १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
  • 🌏अर्ज प्रक्रिया : 
  • १. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • २. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

  • १. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
  • २. अधिवास प्रमाणपत्र

    प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

  • ३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे

    (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

  • ४. वार्षिक उत्पन्न - रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

    • अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
    • ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • ५. नवविवाहितेच्या बाबतीत

    रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

  • ६. बँक खाते तपशील

    (खाते आधार लिंक असावे)

  • ७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

Important Links
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : Click Here

📝 ई -केवायसी 
 (eKYC Website) : Apply Now

👉 जॉब न्युज पोर्टल (Job Portal) : Visit Now

📢 सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Join Now


वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( NMK2 ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नोकरी मार्गदर्शन केंद्र 2 वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area